Sunday, December 3, 2023
Homeउद्योगजगतपंतप्रधानांच्या हस्ते होणार चिंचवडमधील चापेकर बंधू स्मारकाचे उद्घाटन; स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडून ४१ कोटींचा...

पंतप्रधानांच्या हस्ते होणार चिंचवडमधील चापेकर बंधू स्मारकाचे उद्घाटन; स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडून ४१ कोटींचा निधी

क्रांतिवीर चापेकर यांची पुरातन वास्तू नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १२ जून १९९७ रोजी क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले.

चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. आयुक्त शेखर सिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.

उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.

तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू

चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तू होती. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतिवीर चापेकर यांची पुरातन वास्तू नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १२ जून १९९७ रोजी क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, सन १९९७ मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्याअंतर्गत फाऊंडेशन करण्यात आले. दुस-या टप्प्याचे काम सन २००१ मध्ये करण्यात आले. स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तिस-या टप्प्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments