Saturday, December 9, 2023
Homeआंतरराष्ट्रीयप्रसिद्ध हॉलिवूड गायिकेने वॉशिंग्टनमध्ये गायलं भारताचं राष्ट्रगीत; पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले...

प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेने वॉशिंग्टनमध्ये गायलं भारताचं राष्ट्रगीत; पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद!

हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन हिने वॉशिंग्टनमध्ये भारताचं राष्ट्रगीत गायलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज (२४ जून) शेवटचा दिवस आहे. सकाळी त्यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी हॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी मंचावरून भारतीय राष्ट्रगीत जन-गण-मन गायलं. राष्ट्रगीतानंतर मेरीने मंचावर उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या राष्ट्रगीताचा आणि मेरीने पंतप्रधानांना केलेल्या नमस्काराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, असे मेरी प्रसारमाध्यमांना म्हणाली.

रोनाल्ड रेगन येथे जमलेल्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही सर्वांनी अमेरिकेत महान भारताचं एक चित्र तयार केलं आहे. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. मला अमेरिकेत हा जो काही सन्मान मिळतोय त्याचं श्रेय तुम्हालाच जातं. तुम्ही इथे केलेल्या मेहनतीमुळे आणि अमेरिकेच्या विकासात दिलेल्या योगानामुळे मला हा सन्मान मिळतोय. अमेरिकेत राहणाऱ्या भारतमातेच्या प्रत्येक लेकराचे मी आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत सध्या जी प्रगती करतोय त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारतीयांचा अत्मविश्वास. १४० कोटी भारतीयांचा आत्मविश्वास हाच भारतीयांच्या प्रगतीचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळेच आपला देश आज प्रगतीपथावर आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपण हा आत्मविश्वास गमावला होता. परंतु नव्या भारताने तो आत्मविश्वास परत मिळवला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, या नव्या भारताला स्वतःच्या प्रगतीचा मार्ग आणि दिशा माहिती आहे. या भारताच्या मनात आपल्या निर्णयांबद्दल आणि संकल्पांबद्दल कोणताही संभ्रम नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments