Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीपिंपरी विधानसभा परिसरातील ६० हजार घरात भाजपाचे...घर चलो अभियान !!

पिंपरी विधानसभा परिसरातील ६० हजार घरात भाजपाचे…घर चलो अभियान !!

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे झालेल्या विविध लोक कल्याणकारी योजना, केलेली कामे लोकां पर्यंत पोहचवावी यासाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षा द्वारे “घर चलो अभियान” आयोजित करण्यात आले आहे.

मोदी@9 उपक्रमा अंतर्गत पिंपरी विधानसभा परिसरात व्यापारी संमेलन, सोशल मिडिया बैठक, जागतिक योग दिनाचे कार्यक्रमआयोजित करण्यात आले होते . तसेच २३ जून रोजी डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस, जेष्ठ नागरिक संमेलन विषयी नियोजन सुरु आहे . परिसरातील प्रबुद्ध व्यक्तींचे संमेलन २५ जून रोजी आयोजित केले आहे.

पिंपरी विधानसभेतील ३९९ बूथ वर सर्व परिसरात भाजपा संघटन समिती द्वारे घरोघरी जाऊन मोदी सरकारची गेली ९ वर्षात झालेली कामे पोहचवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या विशेष उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधी यांना दिली.

सेवा, सुशासन व गरीब कल्याण हेतू असलेल्या भाजपा संघटन द्वारे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची नोंद घेणार आहेत, तसेच प्रलंबित कामे गतिशील व्हावी यासाठी प्रशासकीय अधिकारी व शासन यांच्या मदतीने प्रयन्त केले जातील असे आमदार उमा खापरे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेतील भाजपाचे आजी माजी सर्व नगरसेवक, आघाडी मोर्चा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते सर्व संघटीत होऊन केंद्र व राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोचवण्याचे काम करणार आहेत, तसेच जनता व सरकार मधला दुवा होउन विकास कामांना गती देण्याचे काम करतील अशी माहिती प्रदेश कार्यकारी सदस्य सदाशिव खाडे यांनी दिली

या वेळी पिंपरी विधानसभा भाजपा निमंत्रित सदस्य राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उप महापौर नानी ( हिराबाई ) गोवर्धन घुले, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, नगरसेवक केशव घोळवे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, माउली थोरात, शितल शिंदे, शैलेश मोरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर , महेंद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments