Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीनिगडी भक्ती-शक्ती पुलाजवळ एलपीजी गॅसचा टँकर उलटला, खबरदारी म्हणून 300 मीटरचा परिसर...

निगडी भक्ती-शक्ती पुलाजवळ एलपीजी गॅसचा टँकर उलटला, खबरदारी म्हणून 300 मीटरचा परिसर बंद

निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाच्या (Nigdi)जवळ एसबीआय बँकेच्या समोर मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियम गॅसचा टँकर आज (रविवारी) पहाटे तीनच्या सुमारास उलटला आहे. यामुळे परिसरात गॅस पसरून धोका होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून अग्निशमनदल व पोलिसांनी घटनास्थळी जात जवळपासचा 300 मीटर पर्यंतचा परिसर पुर्णपणे बंद केला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी असून त्याला त्वरीत पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या, भारत पेट्रोलियमची टीम, निगडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन चे पथक दाखल झाले आहे. जो लिक्वीड गॅस रस्त्यावर सांडला होता त्यावर त्वरीत अग्निशमन दलाने पाणी टाकले आहे. तसेच अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसरा टॅंकर मागवून मशीनद्वारे त्यात भरला जात आहे. जेव्हा हा गॅसचा टँकर उलटला तेव्हा अपघाताचा खूप मोठा आवाज या परिसरात आला.पहाटे तीनची वेळ असल्याने या मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

खबरदारी म्हणून 300 मीटर पर्यंत म्हणजे पूना गेट ते पवळे पुलापर्यंत सर्व परिसर , वाहतूक बंद कऱण्यात आली आहे. दुकाने बंद असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिली आहे. दहा पर्यंत गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरला जाईल त्यानंतर सर्व दळणवळण पूर्ववत होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून धोका तुर्तास टळला (Nigdi) आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments