Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमी'मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’? उद्धवजी, तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…'; फडवीसांचे...

‘मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’? उद्धवजी, तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…’; फडवीसांचे ट्विट चर्चेत

भाजप विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक झाली. काल शुक्रवारी झालेल्या या बैठकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

पाटणा येथे काल (शुक्रवारी) झालेल्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक म्हणजे ‘कुटुंब बचाओ’ मोहीम असल्याचे म्हटले होते. फडणवीसांच्या या उत्तरावर उद्धव ठाकरे यांनी “देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे,असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आता यावर फडणवीस यांनी ट्विटकरून पाहा काय म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस…

मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.”

एवढ्यावर फडणवीस थांबेल नाही. ट्विटमध्ये ते पुढे उद्धव ठाकरेंना म्हणाले, ‘चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर काढा. तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)’, असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला.

ट्विटच्या अखेरीस फडणवीस यांनी ‘तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…,’ असा टोला देखील लगावला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments