Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमीमस्ती की डिजिटल पाठशाला; नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण, नंदुरबारमधील नगर पालिकेच्या...

मस्ती की डिजिटल पाठशाला; नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण, नंदुरबारमधील नगर पालिकेच्या पाच शाळा डिजिटल

नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिल जात आहे. यामुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावणार असून विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड वाढणार आहे.

राज्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत. मात्र नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar School)  शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यामुळे इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण  मिळावे, या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेतील 12 शाळामधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल (Digital School) करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.

नगर पालिकेच्या 16 शाळामधून पाच शाळामधील प्रत्येकी एक खोली डिजिटल

नंदुरबारातील पालिकेच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठवत नसतात परंतु नंदुरबार पालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी या वर्षांपासून आधुनिक शिक्षण दिलं जात असल्याने पालिकेच्या शाळांमध्ये देखील दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या सी एस आर फंडातून 40 लाखाचे मदत मिळवली.या लाखाच्या निधीतून नगर पालिकेच्या 16 शाळामधून पाच शाळामधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे.

प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा एवढा खर्च

नंदुरबारातील प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे. या डिजिटल क्लासरूम साठी 65 इंची डिजिटल टीव्ही ,प्रोजेक्टर, 10 बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले. या आधुनिक उपक्रमामुळे नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली जाणार आहे. तर गणित, इंग्रजी सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे.

शिक्षणाचा दर्जा उंचावणार

नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिल जात आहे. यामुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावणार असून विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड वाढणार आहे. नंदुरबार नगरपालिकेकडून आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवला तर शाळा बंद पडणार नाही.

शाळा डिजिटल व्हायला हव्यात, पण….

अलीकडे शाळा डिजिटल करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मात्र नुसत्या सरकारी कागदावर, निकृष्ट साहित्यांनी न वरवरच्या हेतूने डिजिटल व्हायला नको. राज्यातील सुरुवातीच्या 25 टक्के डिजिटल शाळांचा अभ्यास केला असता काही वर्गवारी करता येते. फार कमी जणांनी डिजिटल यंत्रणा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला पूरक साधन आहे म्हणून ते उभारले, हाताळले नि सांभाळले. त्यात सातत्य ठेवले. बऱ्याच जणांनी नवेपणा, शोभा, तंत्रांचा, तंत्रज्ञांना अतिरिक्त वापर या हेतूने डिजिटल शाळा करण्याचा ध्यास घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments