Sunday, November 10, 2024
Homeताजी बातमी“मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

“मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अजित पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही पक्षकार्याचे वेध लागले आहेत. ‘‘मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, अशी विनंती त्यांनी बुधवारी (२१ जून) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठांकडे केली. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर सुरुवातीला त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, यावर मी काय बोलू? तो त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे. ही त्यांची अंतर्गत बाब आहे. विरोधी पक्षनेतेपदी कोणाला नेमायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. यावर काँग्रेस काय म्हणतंय, शिवसेना काय म्हणतेय हे प्रश्न विचारून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका.

खासदार संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत. तसेच त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात जे वक्तव्य केलं त्यावर इतरांनी काही बोलू नये. अजित पवार त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांचा पक्ष त्यावर निर्णय घेईल, शरद पवार साहेब तसेच त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी असेल तर ती हे सगळं ठरवेल. पवारसाहेब अद्याप यावर काही बोलले नसतील तर आम्ही काय बोलायचं.

अजित पवार त्यांच्या भाषणादरम्यान, म्हणाले “काही लोकांना वाटतं विरोधी पक्षनेता म्हणून मी कडक भूमिका घेत नाही” यावर तुमचं मत काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारला. त्यावर राऊत म्हणाले, ते या पदावर उत्तम काम करत आहेत आणि ते तसं काही बोलले असतील तर त्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही.

खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार विरोधी पक्षनेते पदावर राहणं महत्त्वाचं आहे. ते महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. हा महाविकास आघाडीतला महत्त्वाचा चेहरा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments