बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशल जितका त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो, तितकीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याचीही होतेय. विकीनं अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल फार काही उघड केलं नव्हतं. थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला होता.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या नात्याबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. कधी या दोघांच्या नात्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं म्हटलं जातं, तर कधी दोघांच्या कमाईवरुन तुलना केली जाते. आता अशी चर्चा सुरू आहे की, कतरिनाच्या एका चित्रपटासाठी विकी कौशलनं ऑडिशन दिलं होतं, पण त्याची निवड झाली नव्हती.
शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अभिनेता शारिब हाशमी यानं शाहरुख खानच्या बेस्ट फ्रेंडची म्हणजेच ‘मेजर समर आनंद’ ही भूमिका साकारली होती. पण आता खुद्द शारिब हाशमी यानं एक ही भूमिता आधी विकी कौशल याला ऑफर करण्याच आल्याचं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात विकी सिक्योरिटी गार्डच्या भूमिकेत आहे.
एका मुलाखतीत ए शारिब हाशमी सांगितलं की, शाहरुखच्या बेस्ट फ्रेंडच्या भूमिकेसाठी विकी कौशल यानं ऑडिशन दिलं होतं. पण या भूमिकेसाठी विकी त्यांना योग्य वाटला नाही, आणि त्यांनी विकीला रिजेक्ट केलं. यश राज फिल्मचा हा सिनेमा २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. यात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका होत्या.
दरम्यान, विकी कौशल सारा अली खानसोबत द कपिल शर्मा शोमध्ये त्यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. तेव्हाविकी कौशलनं सांगितलं की, त्यानं आपला वाढदिवस काही मित्रांसोबत साजरा केलेला. तेव्हा कतरिनानं त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली होती.
तर विकी आणि कतरिनाच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलायचं बॉलिवूडचा कुल अभिनेता जितका त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो, तितकीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याचीही होतेय. विकीनं अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल फार काही उघड केलं नव्हतं. थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला होता. झाल्यास, विकी कौशल आता ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘सॅम बहादूर’, ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ आणि ‘डंकी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर कतरिना कैफचा ‘टायगर 3’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.