राहुल आणि दर्शना राजगडावर गेले होते. इथे राहुलने दर्शनाच्या गळ्यावर कटरने तीन ते चारवेळा वार केले. यानंतर..
दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी तिचा मित्र राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येनंतर या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. आता यात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राहुल हांडोरे याने दर्शनाची हत्या कशी केली, याबाबतचा खुलासा पोलिसांसमोर केला आहे. यासोबतच अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचंही त्याने सांगितलं आहे.
एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवारची वनअधिकारी पदी निवड झाली होती. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. शवविच्छेदन अहवालात दर्शना पवारच्या गळ्यावर वार केल्याचं समोर आलं होतं. राहुल हांडोरेला अटक केल्यानंतर त्याने हत्याकशी केली, याबाबतचा खुलासा केला आहे. राहुलने दर्शनाला कसं संपवलं, हे पोलिसांनी सांगितलं आहे.
राहुल आणि दर्शना राजगडावर गेले होते. इथे त्यांच्यात लग्नाच्या विषयावरुन वाद झाला. त्यानंतर राहुलने दर्शनाच्या गळ्यावर कटरने तीन ते चारवेळा वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगडाने वार करत तिची हत्या केली.
का केली हत्या ?
दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.