Tuesday, February 11, 2025
Homeताजी बातमीकपडा तेरे बाप का… Adipurush मधला डायलॉग अखरे बदलला, नवीन संवाद एकदा...

कपडा तेरे बाप का… Adipurush मधला डायलॉग अखरे बदलला, नवीन संवाद एकदा ऐकाच…

Adipurush dialogue change: प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहेत. चित्रपटातील संवाद वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना आता निर्मात्यांनी याची दखल घेत बदल केले आहेत.

गेल्या आठवड्यात ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील संवादांवर अनेक प्रेक्षकांनी आणि संघटकांनी आक्षेप घेतला. त्यामुळं सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल केलं गेलं. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक जाणकार मंडळींनीदेखील या सिनेमावर टीका केली. प्रेक्षकांना खटकले ते या चित्रपटातील काही संवाद. त्यापैकी एक म्हणजे देवदत्त नागे म्हणजेच हनुमानाच्या तोंडी असेलला ‘तेल तेरे बाप का, जलेगी तेरे बाप की’ हा संवाद.

‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरी बाप की’ असा हा संवाद हनुमानाच्या तोंडी असल्याचं पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले, टीका झाली. यानंतर लेगचच दखल घेत लेखक आणि निर्मात्यांनी चित्रपटाच्या या डायलॉगमध्ये बदल करण्यात येईल, असं सांगितलं होतं. आता हा संवाद बदलण्यात आला आहे.

असा आहे नवीन संवाद
‘बाप’ या शब्दाच्या जागी आता ‘लंका’ या शब्दाचा उपयोग या वाक्यात करण्यात आलाय. ‘कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की और जलेगी भी तेरी लंका की’. असा हा बदललेला डायलॉग आहे.

दरम्यान, ५०० कोटींहून अधिकचे बजेट असणाऱ्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्या तीन दिवसात दररोज साधारण ३७ ते ३८ कोटी रुपये कमावले होते. अर्थात पहिल्या तीन दिवसात फारशी घसरण झाली नाही, मात्र चौथ्या दिवशी अचानक मोठी तफावत दिसून आली. ही घसरण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं तिसऱ्या दिवळी ३८ कोटींची कमाई केली होती, या कमाईत चौथ्या दिवशी २८ कोटींची घट झाली. चौथ्या दिवशी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने केवळ १० कोटी कमावले आहेत. या कमाईनंतर चार दिवसांत या सिनेमाची कमाई २४१ कोटी झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments