Thursday, February 6, 2025
Homeआंतरराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनलाच का साजरा करतात? जाणून घ्या महत्व आणि...

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनलाच का साजरा करतात? जाणून घ्या महत्व आणि मान्यता

International Yoga Day 2023: भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊय…

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? जाणून घेऊया

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरवात

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

योग दिवस २१ जूनच का?

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम

योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी “मानवता” ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीद वाक्य असल्याचे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments