Thursday, May 15, 2025
Homeअर्थविश्वGold Rate Today : आनंदाची बातमी! 6 महिन्यांत सोने 9462 रुपयांनी स्वस्त;...

Gold Rate Today : आनंदाची बातमी! 6 महिन्यांत सोने 9462 रुपयांनी स्वस्त; आणखी घसरण होण्याचा अंदाज

सध्या सोने खरेदी करण्यासाठीचा काळ अगदी योग्य असल्याचेच दिसून येत आहे. कारण गेल्या सहा महिन्यात सोन्याचे दर हे 9 हजारांनी खाली आले आहेत. ऑगस्ट 2020 पासून सोन्याच्या दरातील कपात अद्यापही सुरूच आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी 56,200 रुपयांवर पोहोचले होते. त्याच वेळी, आता (5 फेब्रुवारी 2021) सोन्याचे प्रति दहा ग्रॅम दर 46,738 रुपयांवर आले आहेत.

2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दर झपाट्याने वाढले होते.

Also Read: केरळमध्ये सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून त्याचा निषेध केला म्हणून देवेंद्र फडणवीसांचा संताप

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची किंमत वाढत चालली आहे. म्हणूनच सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवर आली आहे. नोव्हेंबर 2020 नंतर हे घडले आहे. चांदीच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार कायम आहे. यामागील औद्योगिक मागणीत तेजी आहे. कमोडिटी मार्केटमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जगातील आर्थिक घडामोडी अशाच प्रकारे चालू राहिल्या, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण येऊ शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments