Saturday, December 7, 2024
Homeआंतरराष्ट्रीयICC World Cup 2023 चे वेळापत्रक जाहीर … !! जाणून घ्या कसा...

ICC World Cup 2023 चे वेळापत्रक जाहीर … !! जाणून घ्या कसा आणि कधी घडणार सामना…!!

आयसीसी वर्ल्डकप २०२३ चे वेळापत्रक ICC कडून जाहीर करण्यात आले आहे. पहिला सामना ५ ऑकटोबर रोजी खेळवला जाणार आहे. पाह संपूर्ण वेळापत्रक

यंदा भारताच्या यजमान पदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक ICC कडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजता आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी, बीसीसीआयने त्यांच्या १२ राज्य संघटनांना बोलावले होते जेथे विश्वचषक सामने होणार आहेत. तयारीचा तपशील आणि जागा निश्चित करण्याबाबत मंडळाने त्यांच्याशी अंतिम चर्चा केली आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.

यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका २०२०-२३ ICC क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतून आणखी दोन संघ स्पर्धेत प्रवेश करतील.

२०१९ च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर नऊ संघांशी खेळेल ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल तर अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments