Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीGold Rate Today: सोन्याच्या दरांचा चढता क्रम, चांदीच्या किमतीत घसरण कायम; पाहा...

Gold Rate Today: सोन्याच्या दरांचा चढता क्रम, चांदीच्या किमतीत घसरण कायम; पाहा आजचा भाव

Gold Silver Price 21 June 2023 : घसरणीचे सत्र मोडून आता सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळी देशांतर्गत फ्युचर्स बाजारात MCX वर सोन्याच्या दरात उसळी आली, मात्र चांदी स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात घसरण झाली असून सकाळच्या सतरा चांदी १९ रुपयांनी घसरून ७० हजार ३६८ वर व्यवहार करत होती.

देशांतर्गत वायदे बाजार म्हणजे MCX वर बुधवारच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली आली आहे. देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमती वाढत असताना बुधवार सकाळी सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ०.०९% किंवा ४६ रुपयांनी वाढीसह ५८,८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार तर ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोने ०.०९% किंवा ५३ रुपयांनी वाढून ५९,१०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदीच्या किमती किरकोळ घट झाली आहे.

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाली आहे, म्हणजे चांदी स्वस्त झाली आहे. MCX वर जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीचा भाव ०.०३% किंवा १९ रुपये घसरून MCX वर ७० हजार ३६८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

दुसरीकडे, गुडरिटर्न वेबसाइटनुसार सोन्याच्या प्रति तोळा दरात ३०० रुपयांची घट झाली आहे. अशा २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,७०० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी कालच्या बंदच्या तुलनेत ३३० रुपयांची घसरण होऊन ५९,६७० इतकी किंमत मोजावी लागेल. दरम्यान, आज सराफा बाजारात प्रति किलो चांदीची किंमत १००० रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजे आज तुम्हाला खरेदीवर कालच्या ६४ हजार रुपयांच्या तुलनेत ७३,००० रुपये प्रति किलो मोजावे लागणार.

सोने खरेदी-विक्रीचे नियम

नवीन आर्थिक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या खरेदी आणि विक्रीचे नियमही बदलले आहेत. नवीन नियमांनुसार आता सोने खरेदी-विक्रीसाठी नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या ज्वेलर्सने असे केले नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, तसेच दंडही भरावा लागू शकतो. सोन्याच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला असून हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) क्रमांक १ एप्रिलपासून सर्व सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य केला आहे.

स्वस्तात सोने खरेदीची संधी

महागलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सर्वसामान्य खरेदीदार हैराण झाले आहेत. सोन्याची प्रति तोळा किंमत ६० हजार रुपयांच्या खाली आल्या असल्या तरी अजूनही सर्वसामान्यांना खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. अशा स्थितीत तुमच्याकडे काही दिवसांसाठी स्वस्त सोने खरेदीची संधी आहे. २०२३-२४ साठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची पहिली मालिका १९ जूनपासून लाँच झाली असून यामध्ये २३ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच ऑनलाइन गुंतवणुकीसाठी ५० रुपयांची सूट उपलब्ध असून सार्वभौम गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवर २.५०% वार्षिक व्याज मिळतो. इच्छूक या योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments