गँगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर हनी सिंगबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हनी सिंगला गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोल्डीने हनी सिंगला धमकीची व्हॉईस नोट पाठवली आहे. धमकी मिळाळ्यानंतर हनी सिंगने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये याबाबत तक्रार केली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हनी सिंहने सांगितले की, “कॅनडातील गोल्डी ब्रार या गुंडाने मला व्हॉईस नोट पाठवली आहे. ज्यामध्ये त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.” हनी सिंगने ती व्हॉइस नोट पोलिसांना दिली आहे. दुसरीकडे, हनी सिंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी गोल्डी ब्रारचे नाव समोर आले होते. गोल्डीने लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडांबरोबर मिळून सिद्धूच्या हत्येचा कट रचला होता. सध्या गोल्डी ब्रार कॅनडामध्ये आहे. ज्यांच्या विरोधात NIA ने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हनी सिंगच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, हनी सिंगने काही काळापूर्वीच इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. नैराश्यामुळे हनीने स्वत:ला कामापासून खूप दिवसांपासून दूर ठेवले होते. हनीने २००५ मध्ये संगीत निर्माता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अनेक हिट गाणी आणि रॅप्सने इंडस्ट्रीला ओळख करून देणारा हनी अचानक ड्रग्सच्या आहारी गेला होता. नंतर बायपोलर डिसऑर्डरचा बळी झाला
यादरम्यान तो डिप्रेशनमध्येही गेला आणि सुमारे १८ महिने बेपत्ता राहिला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूच्या अफवाही अनेकदा उठल्या होत्या. पुनरागमन केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंगने मीडियाला सांगितले की, ‘मी रिहॅबमध्ये असल्याची अफवा पसरली होती, पण पूर्ण वेळ मी माझ्या नोएडाच्या घरात होतो. मला बायपोलर डिसऑर्डर होता’.