Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमी“एकनाथ शिंदेंकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे…”, संजय राऊतांचं मोठं...

“एकनाथ शिंदेंकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे…”, संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं बंड, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) वर्षपूर्ती झाली आहे. एक-एक करत चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. पण, याबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या नव्या भागात संजय राऊतांनी हजेरी लावली. यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं बंड, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

“आमदार सोडून जाणार आम्हाला माहिती होतं”

शिवसेनेतील गळती थांबणार कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. आमदार सोडून जाणार तुम्हाला माहिती होतं का? असा प्रश्न सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी संजय राऊतांना विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमदार सोडून जाणार आम्हाला माहिती होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते. बाकीचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी फोडले.”

“…मी फक्त साहेबांचा शब्द पूर्ण केला”

यावेळी नारायण राणे यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात नारायण राणे म्हणतात की, “भारतात मतदार यादीत नाव नसेल, तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. मी फक्त साहेबांचा शब्द पूर्ण केला. संजय राऊतांना खासदार केलं.” नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“…तर राणेंचं केंद्रीय मंत्रीपद जाऊ शकते”

“हे महाशय खोटे बोलत आहेत. त्यांचं असं विधान आहे की, माझं मतदार यादीत नाव आणि नंबर नव्हता. त्यांनी तेव्हाचा माझा फॉर्म पाहिला पाहिजे. या वक्तव्यावर त्यांचं केंद्रीय मंत्रीपद आणि खासदारकी जाऊ शकते,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments