Tuesday, December 5, 2023
Homeताजी बातमी‘दिल से बुरा लगता है’ मीममधील देवराज पटेलचे निधन; मुख्यमंत्री भूपेश बघेल...

‘दिल से बुरा लगता है’ मीममधील देवराज पटेलचे निधन; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे ट्वीट

‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ मीम मुळे चर्चेत आलेला YouTuber देवराज पटेल याचे छत्तीसगडमधील रायपूर येथे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे

‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ मीम मुळे चर्चेत आलेला YouTuber देवराज पटेल याचे छत्तीसगडमधील रायपूर येथे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे तसेच देवराजला श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. “एवढ्या लहान वयात अतुलनीय प्रतिभेच्या कलाकाराला गमावणे अत्यंत दुःखद आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.” असे बघेल यांनी लिहिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवराज पटेल याचा अपघात लाभांडी चौक परिसरात झाल्याचे समजतेय. याठिकाणी एका अनियंत्रित ट्रकने बाईकला टक्कर दिली आणि त्यातच देवराज पटेलने जीव गमावला. याबाबत माहिती देताना ट्वीटसह मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये देवराज पटेल हा छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत एक मी आणि एक म्हणजे आमचे काका असे म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, मृत्यूच्या काहीच तास आधी देवराज पटेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. प्राप्त माहितीनुसार देवराज रील शूट करण्यासाठी नवे रायपूर येथे आला होता व परतीच्या प्रवासाच्या वेळी हा अपघात घडला. देवराज अवघ्या २१ वर्षाचा होता व सध्या बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.

देवराज पटेल याने भुवन बामच्या ढिंढोरा या सीरीजमध्ये सुद्धा काम केले होते. दिल से बुरा लगता है भाई प्लीज या मीममुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या देवराजचे युट्युबर १ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स व ५६ हजाराहून अधिक फॉलोवर्स होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments