Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीदौंड तालुका हादरला…डॉक्टरची पत्नी मुलांसह आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत

दौंड तालुका हादरला…डॉक्टरची पत्नी मुलांसह आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत

पुण्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे.

दौंड तालुक्यातील वरवंड येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीचा गळा आणि आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे.

डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले असून मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी अडचण येत असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या घटनेने वरवंड गावावर शोककळा पसरली आहे. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर असून त्यांची पत्नी ही एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनस्थालावरून सूसाईड नोट मिळाली असून पुढील तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments