Monday, October 7, 2024
Homeगुन्हेगारी"की लगेचच आम्ही सलमानला ठार मारु" पुन्हा एकदा गँगस्टर गोल्डी ब्रारने सलमान...

“की लगेचच आम्ही सलमानला ठार मारु” पुन्हा एकदा गँगस्टर गोल्डी ब्रारने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

गँगस्टार गोल्डी ब्रारने पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अजूनही तो गँगस्टारचं टार्गेट असल्याचं स्पष्ट झालं आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

गँगस्टर गोल्डी ब्रारने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमान आमचं टार्गेट असून आम्हाला संधी मिळाल्यावर आम्ही त्याला मारुन टाकू, असं त्याने म्हटलं आहे. तसेच लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवालाची हत्या त्याच्या टोळीनेच केली असल्याची कबुलीदेखील त्याने दिली आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गोल्डी ब्रार म्हणाला,”आम्हाला संधी मिळाली की लगेचच आम्ही सलमानला ठार मारु. आमचा भाई लॉरेन्स बिश्नोईनेदेखील (Lawrence Bishnoi) त्याचा माफी मागायला सांगितली होती. पण अद्याप त्याने माफी मागितलेली नाही. फक्त सलमान खानच नाही तर जो कोणी आमचा शत्रू असेल त्यांना नक्कीच आम्ही मारुन टाकू. सध्या तरी सलमान आमचं टार्गेट आहे”.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं कारण सांगत गोल्डी ब्रार म्हणाला,”सिद्धू मुसेवाला खूप वाईट होता. त्याला खूप गर्व होता. तसेच गरजेपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसे त्याच्याकडे होते. राजकीय मंडळी आणि पोलीस शक्तीचा त्याने गैरवापर केला. त्यामुळे त्याला धडा शिकवण्याचं गरजेचं होतं”.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनीदेखील त्याला Y+ सुरक्षा दिली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने बुलेटप्रुफ गाडीदेखील खरेदी केली आहे.

सलमान खान धमक्यांना घाबरणारा नाही

लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांबद्दल सलमान खान म्हणाला होता,”धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल”.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments