Monday, July 14, 2025
Homeआरोग्यविषयकपावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

लहान मुलांना पावसाळा (Monsoon) आला की, पावसात भिजायला खूप आवडते. मात्र त्यानंतर लगेच लहान मुले संसर्गजन्य आजारांचे बळी ठरतात. ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा फटका लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसतो. अशा वेळी घरातील लहान मुलांची कोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी जाणून घेऊया.

1. पावसाळ्यात लहान बाळांना फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होण्याचा मोठा धोका असतो. पावसाळ्यात त्वचा खूप ओली आणि तेलकट होते. त्यामुळे हवेतील धूळ आणि जंतू लगेच त्वचेवर चिकटतात. यामुळे फंगल इंनफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. फंगल इन्फेक्शन झाल्यास त्वचा लाल होते, खाज सुटणे आणि शरीरावर पुरळ येऊ शकते.

2. पावसाळ्यात लहान मुलांना मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार बळावतात. पावसामुळे नाल्यात किंवा खड्ड्यात पाणी साचते, त्यामुळे डासांची पैदास होते. मलेरियामुळे ताप, अशक्तपणा सर्दी अशा समस्या उद्भवतात.

3. पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी आणि फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. लहान बाळांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने त्यांना या रोगांची लागण तात्काळ होते.

4. लहान बाळांसाठी अनेक जण लंगोटचा वापर करतात. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. ओले कपडे किंवा लंगोट घातल्यास पुरळ उठण्याची समस्या उद्भवते.

5. लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खायाला खूप आवडते. मात्र पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आणि पाणी पिणे टाळावे. कारण तुम्ही जर का बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्हाला हिपॅटायटिस ए सारखे विषाणूजन्य संसर्ग तुमच्या शरीरात पसरु शकतो. पावसाळ्यात अनेकदा जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असते. ज्यामध्ये घाण पाणी हे साचलेले राहते, त्यामुळे कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांच्या संपर्कात येणे अगदी सोपे होते. ताप येणे, प्रचंड डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी ही कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या रोगाची लक्षणे असू शकतात. यांचे प्राथमिक लक्षण म्हणून तुमच्या यकृतावर सूज येऊ शकते. डोळ्यांचा, हाताच्या बोटांचा आणि लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो, भूक न लागणे अशा तक्रारी आपोआप वाढू लागतात.

6. नवजात बालकांनाही डेंग्यूची समस्या असू शकते. जर तुम्ही कूलर चालवला तर त्यात असलेल्या पाण्यात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नवजात बालकांना ताप, सर्दी, फ्लू होऊ शकतो.

पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

बाळाला दमट खोलीत ठेवणे टाळा. थंड हवेचा संपर्क टाळा. बाळाचे केस आणि त्वचा कोरडी ठेवा.

नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याला स्तनपान करा. कारण स्तनपानामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

घरात पूर्ण स्वच्छता ठेवा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरुन संसर्ग डास आणि माश्यांद्वारे पसरु नये.

बाळाला जाड सुती कपड्यांचा वापर करा आणि वापरण्यापूर्वी कपडे पूर्णपणे उन्हात वाळलेले किंवा इस्त्री केलेले आहेत याची खात्री करा.

इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात जास्त वेळा बाळाचे डायपर बदला. जर पुरळ उठले तर लगेच बेबी पावडर वापरा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments