देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, या पावसामुळे नवी दिल्ली, चंदीगड आणि गुजरात आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये डोळे येण्याची साथ फोफावत आहे. त्यामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला खाज सुटण्याच्या, तसेच डोळे लाल होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पण हे नेमकं आहे काय? तर या साथीमध्ये डोळ्याच्या बाहेरील पांढऱ्या थराची जळजळ होते, असे डॉक्टर दिलीप गुडे यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार यांनी सांगितलं आहे.
तज्ज्ञ सांगतात, “या साथीमध्ये सहसा राग लाल , गुलाबी किंवा लाल डोळे दिसतात, सामान्यत: हा प्रसार ऑटोनोक्युलेशन (संक्रमित हात/बोटांनी डोळे चोळणे) आणि एरोसोल पसरवण्याने होतो.” आपल्याला माहिती आहे की, गर्दीच्या ठिकाणी डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला खाज सुटण्याची अधिक शक्यता असते. “सार्वजनिक वाहतूक, शाळा, मॉल्स किंवा कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांच्या जवळ असतात, ज्यामुळे संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर जाण्याची शक्यता असते.” असं डॉ सौरभ वार्ष्णेय, वरिष्ठ सल्लागार, नेत्ररोग, प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली यांनी म्हटलं आहे. तर अशा परिस्थितीत डोळ्यांची जळजळ होण्यापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी काही उपाय सुचवले आहेत, ते जाणून घेऊया.
स्वच्छता –
आपले हात साबण आणि पाण्याने कमीतकमी २० सेकंदांसाठी वारंवार धुवा, विशेषत: आपल्या चेहऱ्याला स्पर्श केल्यानंतर किंवा सार्वजनिक ठिकाणी पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यानंतर हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करु नका.
संक्रमित व्यक्तींशी संपर्क टाळा –
जर एखादा व्यक्ती डोळ्यांच्या साथीने ग्रस्त आहे तर संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांच्या वस्तू वापरणं टाळा –
टॉवेल, मेकअप किंवा डोळ्यांच्या संपर्कात येऊ शकणार्या कोणत्याही वस्तू एकमेकांशी शेअर करु नका.
हँड सॅनिटायझर –
साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, आपले हात स्वच्छ करण्यासाठी किमान ६० टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझरचा वापर करा.
चष्मा वापरा –
जर तुम्ही सहसा कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर, वाढत्या संसर्गाच्या काळात चष्मा वापरण्याचा विचार करा, कारण कॉन्टॅक्ट लेन्स परिधान केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.
डोळे चोळू नका –
डोळे चोळल्याने त्यांना आणखी त्रास होऊ शकतो आणि संभाव्यतः संसर्ग तुमच्या डोळ्याच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो.
घरीच थांबा –
तुम्हाला डोळ्यांच्या साथीची समस्या उद्भवल्यास गर्दीच्या ठिकाणी, शाळेत किंवा कामावर जाणे टाळा जोपर्यंत तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला नाही तोपर्यंत असे करणे सुरक्षित आहे.
वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरण करा –
तुम्हाला डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारी जळजळ किंवा डोळ्यांत लालसरपणा, खाज सुटणे अशी लक्षणे जाणवत असल्यास, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. पुढील प्रसार टाळण्यासाठी उपचार आणि स्वच्छतेसाठी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा.