Wednesday, December 6, 2023
Homeताजी बातमीचमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात कशी झाली ?

चमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात कशी झाली ?

मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टींची आठवण येते, त्यापैकीच मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे वडापाव ! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापाव एक नंबर ला आहे. आपणही जर मुंबई ला गेले असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापाव ची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव चा समावेश होतो. मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.

चमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात अश्या प्रकारे झाली! –

वडापाव काय आहे?

वडापाव एक प्रसिद्ध डिश आहे. एका पावाला मधोमध कापून त्यामध्ये आलुच्या चटणीच्या गोळ्याला तेलात तळून घेतलेलं असते आणि त्या गोळ्याला पावाच्या मध्ये टाकून खाल्ले जातं. वडापाव खायला खूप चवदार लागतो. त्याच्या नावानेही आपल्या तोंडात पाणी येत.

वडापाव ची सुरुवात कशी झाली?

आजपासून ५७ वर्षाअगोदार १९६६ मध्ये वडापाव ला अशोक वैद्य या व्यक्तीने दादर च्या रेल्वे स्टेशन वर वडापाव विकण्याला सुरुवात केली होती. आणि त्यांनी सर्वात आधी वडापाव चा स्टॉल लावला होता.

१९७० आणि १९८० च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते. तेव्हा तेथील हजारो मजुरांना कामाची कमतरता भासली होती, तेव्हा त्यापैकी अनेकांनी वडापाव चे स्टॉल लावून आपल्या धंद्याला सुरुवात केली होती. आणि या साठी त्यांना आपल्या महाराष्ट्रातील तेव्हाची पार्टी शिवसेनेने हे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते. जेव्हा शिवशेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापाव चा अल्पोआहार देण्यात येत असे.

तेव्हा दक्षिण भारताची प्रसिध्द डिश उडुपी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची पण जेव्हा वडापाव ची सुरुवात झाली तेव्हा वडापाव ने त्या डिश ला सुध्दा मागे टाकले जाते. आणि देशाच्या प्रत्येक राज्यात आज मुंबईचा वडापाव म्हणून ही डिश प्रसिध्द झालेली आहे.

१७ व्या शतकात युरोपातील देशातून आलू आणि पाव हे खायचे पदार्थ आले होते. परंतु त्यांना योग्य प्रकारे भारतात बनविल्या गेल्या. सर्वात आधी वडापाव ही डिश आपल्या देशात बनविल्या गेली होती. आणि ह्यावर एक डॉक्युमेंटरी सुध्दा बनविल्या गेलेली आहे. त्यामध्ये दाखवले गेले आहे की वडापाव ला बनविण्याची आयडिया त्यांना कशी मिळाली. हे दाखविले आहे. तर आपणही ह्या डॉक्युमेंटरी ला अवश्य पहा.

तर आजच्या लेखात आपण पाहिले की कश्या प्रकारे आपल्या देशात वडापाव ची निर्मिती झाली. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments