बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अॅक्शन आणि कॉमेडीचा किंग आहे. मोठ्या पडद्यावरही उत्तम विनोदी कौशल्य आहे. त्याचे कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच खुप मनोरंजन करत असतात. हाऊसफुलच्या सर्व फ्रँचायझींमध्ये अक्षयने प्रेक्षकांना खुप हसवले आहे.
आता पुन्हा अक्षयने त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आता अक्षय कुमार साजिद नाडियाडवालासोबत हाऊसफुल 5 ची तयारी करत आहे. खुद्द अक्षयनेच याबाबत माहिती दिली आहे. इतकच नाही तर चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतही त्याने पोस्ट शेयर करत माहिती दिली आहे.
अक्षय कुमारने हाऊसफुल 5 ची घोषणा केली आहे, हा कॉमेडी फ्रँचायझीचा पाचवा भाग आहे. तो म्हणाला की या चित्रपटात ‘पाचपट वेडेपणा’ असेल. तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मिती करणार आहे.त्याच्या ट्विटने आता रितेश देशमुख या चित्रपटाचा भाग असेल याची पुष्टी झाली आहे . मात्र अजून उर्वरित कलाकार कोण आहेत हे उघड झाले नाहीत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या सुमारास चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “हाउस ऑफ फ्रँचायझीकडून, साजिद नाडियाडवालासोबत आम्ही आमचा पुढील भाग ‘हाऊसफुल 5’ सादर करत आहोत, ज्याचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. दिवाळी 2024 ला तुम्ही चित्रपटगृहात हा चित्रपट पाहू शकतात.
अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि बॉबी देओल देखील ‘हाऊसफुल 5’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. असा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.
साजिद नाडियादवालाने 2010 मध्ये ‘हाऊसफुल’ फ्रँचायझी सुरू होती. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये प्रचंड होती. ही क्रेझ लक्षात साजिद नाडियादवालाने 2012 मध्ये त्याचा दुसरा भाग रिलीज केला. 2016 मध्ये ‘हाऊसफुल 3’ आणि 26 नोव्हेंबर 2019 रोजी ‘हाऊसफुल 4’ रिलीज झाला. आता दिवाळीला या सिरिजचा पाचवा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.