९ जुलै २०२१,
स्वीडनमधील ओरेब्रो शहरात घडलेल्या एका विमान दुर्घटनेत या विमानाचा पायलट व आठ स्कायडाइव्हर्स यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. स्वीडन पोलिसांकडू गुरूवारी ही माहिती दिल्याचे रॉयटर्सच्या हवाल्याने एएनआयाने वृत्त दिले आहे.
स्वीडनच्या ज्वाइंट रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर(जेआरसीसी)च्या मते हे एक छोटे प्रोपेलर विमान होते, ज्याला ओरेब्रो विमानतळाजवळ स्टॉकहोमपासून १६० किमी अंतरावर अपघात झाला. जेआरसीसीने सांगितले आहे की, हे विमान रनवेवर आढळून आले. उड्डाण घेतानाच विमानाचा अपघात झाला. या विमानात एकूण ९ जण होते. २०१९ मध्ये देखील उत्तरपूर्व स्वीडनमधील यूमीया शहरात अशाचप्रकारे विमान दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये देखील ९ जणांचा मृत्यू झाला होता.