Tuesday, April 21, 2026
Homeगुन्हेगारीचिंचवडगावात भीषण अपघात; मिक्सर ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

चिंचवडगावात भीषण अपघात; मिक्सर ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

चिंचवडगावातील प्रेमलोक पार्क येथून आकुर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी (दि. १२) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सुमारे दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयाच्या अगदी जवळ घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फारुक असे मृत मुलाचे नाव असून तो चिंचवडेनगर परिसरातील रहिवासी होता. फारुक सायकलवरून जात असताना मागून वेगात आलेल्या मिक्सर ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला.

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रक चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments