Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षिस वितरण

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षिस वितरण

पर्यावरण जागृती आणि सजावट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आपल्या संस्कृतीचे आणि पर्यावरण विषयी जागरूकतेचे दर्शन घडविले आणि सजावटीच्या विविध सुंदर कला सादर केल्या, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिडा विभागाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ४५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षिस वितरण सोहळा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या बक्षिस वितरण समारंभास उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, स्मार्ट सिटीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, क्रीडा अधिकारी अनिता केदारी आदी उपस्थित होते.

घरगुती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या वेद धीमाते यांनी उत्तराखंड येथे असलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली होती. तर दुसरा क्रमांक पटकावलेल्या सिद्धी दांगट यांनी देवीची साडेतीन शक्तिपीठ असलेल्या सुंदर मंदिराची प्रतिकृती साकारली होती. तिसरा क्रमांक पटकावलेल्या भाग्यदेव घुले यांनी जेजुरी गडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती आणि त्यावर गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तसेच मनमोहन कोटूरकर, लिना जाधव आणि चंद्रवदन चांडक यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या स्पर्धेसाठी समाज माध्यमावरील प्रसिद्ध प्रभावक पुणेकर स्नेहा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले आणि विजयी स्पर्धकांची निवड केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments