Tuesday, July 16, 2024
Homeगुन्हेगारीवरळीत 'हिट अँड रन’ घटनेची पुनरावृत्ती , महिलेचा मृत्यू

वरळीत ‘हिट अँड रन’ घटनेची पुनरावृत्ती , महिलेचा मृत्यू

पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. तोच अशाच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वरळी येथे झाली, जेथे शिवसेना नेत्याच्या मुलाने मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला ध़डक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती गंभीर जखमी आहेत. शिवसेना नेते राजन शाह यांचा मुलगा असलेला आरोपी मिहीर शाह तेव्हापासून फरार असून ४८ तासानंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी होतं अशी माहिती उघड झाली आहे.

नेमकं काय झालं ?

या अपघाता प्रकरणी मुख्य आरोपी फरार असला तरी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हरला अटक केली. अपघातानंतर पळून जा, अपघाताचं खापर ड्रायव्हरवर फोडू असा सल्ला राजेश यांनी मुलाला दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याचे वडील सध्या पोलिसांच्या ताब्यात आत आहेत. पण आत संपूर्ण शाह कुटुंबचं दोषी ठरण्याची शक्यत आहे. पुणे पोर्श प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग हा गुन्ह्यात निदर्शनास आला. तसाच काहीसा प्रकार वरळी ‘हिट अॅड रन’ प्रकरणात समोर आला आहे. कारण रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्या, त्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचे घर गाठले.

मात्र तिथे जाण्यापूर्वी त्याने तिला ३० पेक्षा जास्त वेळा फोन केला. अखेर गर्लफ्रेंडचे घर गाठल्यावर त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तो तेथेच दोन तास झोपला. घडलेली सगळी घटना कळल्यावर गर्लफ्रेंडने मिहीरच्या घरी फोन करून तो आपल्या घरी आल्याचे सांगितले. ते कळताच मिहीरच्या बहिणीने मैत्रीणीचे घर गाठले. त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली येथील घरी गेली. आणि अवघ्या काही वेळांतच घराला कुलूप लावून आरोपी मिहिर, आई आणि बहिणीसह पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता पोलिस हे याप्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे. दरम्यान हा तपास सुरू असातनाच मिहीरचा मोबाइलही पश्चिम द्रूतगतीमार्गावर कांदिवली-बोरिवली दरम्यान बंद केल्याचे समोर आले असून तेच त्याचे शेवटचे लोकेशन होते असे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवला आहे.

वरळीत ‘हिट अँड रन’ घटनेची पुनरावृत्ती , मुंबई पोलिसांचा मोठा दावा

रविवारी पहाटे वरळीच्या ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला. त्यानंतर महिरीने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्याला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. तसेच या अपघाताचा आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लान होता. त्याप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला असे समजते. तसेच ज्या बीएमडब्ल्यूने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजनाही राजेश शाह यांनी आली होती, असेही चौकशीतून समोर आले आहे. ज्यामुळे मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.

पहाटे झालेल्या अपघातानंतर आरोपी मिहिरने घटनास्थळावरून पळ काढला. पश्चिमद्रूतगती मार्गे तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली. त्यामुळे त्याने ती गाडी वांद्रे कलानगर येथे सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिहिरने वडिलांना दिली. त्यानंतर मिहिरचे वडिल राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी राजेश शाह यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह व नंबरब्लेट काढून बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एवढंच नव्हे तर ती ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही पाचरण करण्यात आले होते. या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्याने ती गाडी अज्ञात स्थळी लपवण्याता आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र तेवढ्यात पोलिस तेथे आल्याने राजेश यांचा प्लान फसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments