Tuesday, March 18, 2025
Homeअर्थविश्वमुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

मुंबै बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी दिलासा आहे. दरेकर यांच्यावर तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई बँकेच्या संचालक मंडळाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे बँकेचे अध्यक्ष दरेकर यांच्यासह इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टात सी-समरी रिपोर्ट सादर केला होता. गुप्ता यांनीही हा अहवाल मान्य करण्यास आपली काहीच हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, पंकज कोटेचा नामक तक्रारदारानं यास आक्षेप घेतला व २०१४ साली त्यांनी केलेल्या तक्रारीच्या चौकशीची मागणी केली. कोटेचा यांच्या आक्षेपानंतर न्यायालयानं सी समरी रिपोर्ट फेटाळून लावत या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरेकर यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतली. त्यांना वेळ देतानाच न्यायालयानं दरेकर यांनाही तात्पुरता दिलासा दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments