Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती? नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती? नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हेल्मेट वापराबाबत जागृती करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.

मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. महिला, महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुलींच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात येणार आहे. भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविणे, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग, तसेच सराइतांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून उपाययोजना करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments