Friday, June 21, 2024
Homeweather update९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर ६ विभागांना ऑरेंज अलर्ट …मुंबईत पावसाचा...

९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर ६ विभागांना ऑरेंज अलर्ट …मुंबईत पावसाचा कहर

मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने सकाळीच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार,मुंबईत जरी रिमझिम पाऊस बरसत असला तरी उपनगरात जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच, हवामान विभागाने पुढील काही दिवस ६ विभागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. संपूर्ण राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत. तर पुढील ३ ते ४ तास मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील ९ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यांना अतिमुसळधार पासवाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ९ जिल्ह्यांना काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर, मुंबई, ठाणे, पालघरसह ६ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि रायगडला पुढील तीन दिवस, ठाणे आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस तर मुंबई आणि सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती आहे.

पाहिल्याच पावसाचा कहर; भिवंडीतील बहुतांश सखल भाग जलमय

भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळ पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट,बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले.येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. पावसाने भिवंडी महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.

३५ फूट उंच पिंपळाचे झाड कोसळून मालाड येथे ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी चाळीतील शौचालयात गेला होता. यावेळी हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments