दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळिशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे. तुलनेत मुंबईत तापमान कमी असले तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत़.
यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या मुंबईसह कोकण वगळता बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास गेले आहे.