पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचना ऐकण्यासाठी सुनावणी १० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सुनावणी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अधिकारी श्री. विनोद दराडे (भा. प्र. से.), प्रधान सचिव, सहकार व पणन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
सुनावणीचे आयोजन ऑटो क्लस्टर, एच-ब्लॉक, सी-१८१, डी-मार्ट मागे, चिंचवड, पुणे-१९ येथे करण्यात आले असून, नागरिकांनी त्यांच्या हरकतीनुसार निश्चित वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
📌 सुनावणी वेळापत्रक : (१० सप्टेंबर २०२५)
⏰ दुपारी १.०० वा. – गट A1
भाग क्र. 1, 2, 25 ते 39, 70 ते 150, 302 ते 313
⏰ दुपारी २.०० वा. – गट A2
भाग क्र. 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 20 (हरकती क्रमांक 9, 18, 43, 194 ते 293, 46 ते 322)
⏰ दुपारी ३.०० वा. – गट A3
भाग क्र. 9, 10, 11, 20, 30 (हरकती क्रमांक 10, 12 ते 272, 215 ते 220 इ.)
⏰ दुपारी ४.०० वा. – गट A4
भाग क्र. 14, 19, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31, 32 (हरकती क्रमांक 2, 20, 22 ते 318 इ.)
👉 सुनावणीसाठी संबंधित नागरिकांना ओळखपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असून, याबाबतची अधिक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in उपलब्ध आहे.


