Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीतो अगोदर नापास दाखवला अन् रिचेकिंगनंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल (NEET) नीट...

तो अगोदर नापास दाखवला अन् रिचेकिंगनंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल (NEET) नीट चा नेटका घोळ

२१ ऑक्टोबर २०२०,
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला. दरम्यान, या निकालात झालेली एक मोठी चूक समोर आली आहे. ही परीक्षा दिलेल्या मृदुल रावत या विद्यार्थ्यास एनटीएकडून देण्यात आलेल्या मार्कशीटमध्ये तो नापास झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र तो एसटी कॅटेगरीत देशात पहिला आलेला होता. ही चूक पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर उघड झाली.

नीट परीक्षेत नापास झाल्याचं दाखवण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्याने निकालावर आक्षेप घेत, ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिका (Answer Key)च्या आधारावर निकालाला आव्हान दिलं. त्यानुसार पुन्हा तपासणी करण्यात आल्यावर तो एसटी कॅटेगरीत देशात अव्वल असल्याचं समोर आलं.

मृदुलने म्हटले की, एनटीएच्या निकालातील माझ्या गुणांनुसार मी नीट २०२० परीक्षेत नापास झालो होतो. या गुणांसह कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय मिळणार नव्हतं. यामुळे मला अक्षरश: रडू येत होतं व मी नैराश्यात गेलो होतो. कारण मला खात्री होती की मी नीट परीक्षा ६५० गुणांसह उत्तीर्ण होणारच. परंतू हा निकाल पाहिल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. यानंतर मी एटीएच्या निकालाला आव्हान दिलं व पुन्हा तपासणी झाल्यावर माझा खरा निकाल समोर आला. एनटीएने चूक मान्य केल्याने मी आनंदी आहे. मी ६५० गुणांसह एसटी कॅटेगरीत देशात अव्वल आहे. तर, सर्वसाधरण श्रेणीत माझा देशात ३५७७ वा क्रमांक आहे.

Campus Sutra Men Striped Denim Jeans

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments