पुण्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे विभागातून सुटणाऱ्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या काळात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत.
जळगाव भुसावळ विभागात रेल्वेचा तिसरा मार्ग आणि यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे विभागातून सुटणाऱ्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहा गाड्यांचे मार्ग बदण्यात आले आहेत. सुट्टीच्या काळात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत.
या गाड्या रद्द होणार
दिनांक १२ व १४ ऑगस्ट रोजी सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
दिनांक १३ ऑगस्ट रोजी सुटणारी नागपूर- पुणे एक्सप्रेस, जबलपूर-पुणे
दिनांक १४ ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-नागपूर, पुणे-जबलपूर, नागपूर-पुणे, गोंदिया-कोल्हापूर
दिनांक १५ ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-नागपूर एक्स्प्रेस
दिनांक १६ ऑगस्टला सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही
मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १४ ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे -हावडा, पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस लोणावळा-पनवेल-वसई रोड-उधना-जळगाव या मार्गाने धावेल.
- दिनांक १४ ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, पुणे-दानापूर एक्सप्रेस, वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस लोणावळा-वसई रोड-उधना-जळगाव या मार्गाने धावेल.
- दिनांक १३ ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी दानापूर-पुणे एक्सप्रेस, जसीडीह-पुणे एक्सप्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस जळगाव- वसई रोड – लोणावळा या मार्गे धावेल.
- दिनांक १३ ऑगस्ट रोजी सुटणारी जम्मूतावी-पुणे झेलम एक्सप्रेस जळगाव- वसई रोड-कल्याण-लोणावळा या मार्गे धावेल.
- दिनांक १४ ऑगस्ट रोजी निघणारी हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेस इटारसी-नागपूर-बल्लारशा या मार्गे धावेल.