Friday, June 13, 2025
Homeगुन्हेगारीहौस पडली महागात; गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट करणारया नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा...

हौस पडली महागात; गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट करणारया नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा दाखल

१३ जुलै २०२१,
पुण्यातील दिवे घाटात एका नववधूला चक्क गाडीच्या बोनेटवर बसून आपल्या विवाह सोहळ्याला जाण्याची हौस महागात पडली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेगळ काही करण्याच्या प्रयत्नात या नववधूला नियमांचा विसर पडला होता. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

भोसरी परिसरातील सहकार कॉलनी चक्रपाणी वसाहत येथे राहणाऱ्या वधूने आपल्या विवाह सोहळ्यासाठी जात असताना दिवे घाटात चक्क गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला होता. या प्रसंगाची व्हिडिओग्राफर मार्फत शूटिंग देखील सुरु होती. गाडीमध्ये मुलीचे नातेवाईक देखील उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गाडीचा चालक. बोनेटवर बसलेली वधू आणि व्हिडिओग्राफर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २६९,१८८,२७९,१०७,३३६,३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०५ कलम ५१ ब आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळावारी सकाळी ११ वाजता स्कॉर्पिओ गाडी चालक हयगयीने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याने नातेवाईक असलेल्या वधूला गाडीच्या बोनेटवर बसवले होते. तर इतर लोक गाडीत बसले होते. त्यावेळी व्हिडिओग्राफर याचे व्हिडिओ शूटिंग करत असताना इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे वर्तन करत होते. तसेच चेहऱ्यावर मास्कही नसल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments