21 November 2020.
हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी कोरोनावर तयार होत असलेली ‘कोवॅक्सिन’ लस टोचून घेतली. या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दावा केला की काही महिन्यातच कोरोना लस तयार होईल.
पुणे येथील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने कोरोना लशीची किंमत काय असेल हे स्पष्ट केलं. लशीच्या एका डोसची किंमत पाचशे ते सहाशे रुपये असेल असं संस्थेनं स्पष्ट केलं.
आतापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांच्या फरकाने लशीचे दोन डोस घ्यावे लागतील असं अनुमान आहे.
या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना लस लोकांपर्यंत कशी पोहोचणार यावर चर्चा सुरू झाली आहे.