Saturday, March 22, 2025
Homeक्रिडाविश्वएसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरी...

एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरी…

महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद

जम्मू येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्य पदक पटकाविले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एसबी पाटील पब्लिक स्कूलची हर्षिता काकडे हिने महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात चमकदार कामगीरी केली. पश्चिम बंगाल संघाने महिलांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले.

राष्ट्रीय पातळीवर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत कनिष्ट महिला गटासाठी निवड होणारी हर्षिता काकडे हि पिंपरी चिंचवड शहरातील आतापर्यंतची एकमेव महिला खेळाडू आहे. हर्षिताला प्रशिक्षक धनाजी पाटील, मनोज काळे, प्रिया जोशी, सुनिता वासुदेव व श्रीकांत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्राचा संघात हर्षिता काकडे सह सृष्टी भावसार, रिया केळकर, देवयानी कोलते, अनुष्का पाटील यांचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनीहर्षिता काकडे व तिला मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments