Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीप्रीतिश देशमुखच्या घरी पोलीस भरतीची हॉल तिकीट; आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी...

प्रीतिश देशमुखच्या घरी पोलीस भरतीची हॉल तिकीट; आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर

म्हाडा नोकर भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीत पोलिसांनी टीईटी परीक्षेतला (TET) गैर प्रकार उघडकीस आला. ता प्रीतिश देशमुखच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडल्यानं पोलीस भरती देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकलीय.

पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात ?
प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रे सापडली आहेत. आरोग्य भरती, म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीची परीक्षा ही संशयाच्या भोवऱ्यात आलीय. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घरातून आता सन 2019 व 2021 च्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या आधी त्याच्या घरी टीईटी परीक्षांची अपात्र परीक्षार्थींची ओळखपत्रे, हॉलतिकीट सापडले होते.

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीनं राज्यातील कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सोलापूर आदी ठिकाणी पोलीस भरती परीक्षा घेतल्या आहेत. पुण्यात परीक्षा पद्धतीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवल्याने गैरकारभारास वाव मिळाला नाही. मात्र, इतर कोणत्या ठिकाणी गैरप्रकार झाला का, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

प्रीतिश देशमुखच्या घर व कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये आत्तापर्यत 23 हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, 41 सीडी व इतर कागदपत्रे सापडली आहेत. हरकळचा लॅपटॉपही यापूर्वी जप्त करण्यात आलाय. याच्यातपासातून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

प्रीतिश देशमुखला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
आरोग्य भरती पेपरफुटीतील आरोपी उद्धव नागरगोजे नंबर डॉक्टर संदीप जोगदंड श्याम मस्के राजेंद्र सानप महेश बोटले यांना 20 तारखेपर्यत पोलीस कोठडी देण्यात आलीय. तर अजय चव्हाण नंबर अंकित चनखोरे आणि कृष्णा जाधव यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालीय. म्हाडा पेपर फुटीतील आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना 23 तरखेपर्यत पोलीस कोठडी देण्यात आलीय. आरोग्य भरतीतील आरोपी अंकित चनखोरे, अजय चव्हाण आणि कृष्णा जाधव यांच्यावर म्हाडाच्या पेपरफुटीचाही गुन्हा दाखल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments