पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. कोयता गॅंगच्या अल्पवयीन टोळीने दोघांवर कोयत्याने वार करत दिसेल त्या महिलेचे सोन्याचे दागिने लुटले. त्याचबरोबर दुचाकीवरून येणाऱ्या वाहन चालकांचे मोबाईल देखील हिसकावून पळ काढल्याची घटना चिखली परिसरातील साने चौकात घडली आहे.
याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिखली परिसरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना अद्दल घडवण्याची गरज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पाच मुलांच्या टोळीने चिखली परिसरात दहशत पसरविण्यासाठी मध्यरात्री दोघांवर कोयत्याने वार केले. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना थांबून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले. हा सर्व प्रकार दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला असून कोयता गॅंगच्या अल्पवयीन मुलांचा हैदोस सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.