Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रएच. ए. स्कूल पिंपरी च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कलादालनाचे उद्घाटन

एच. ए. स्कूल पिंपरी च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कलादालनाचे उद्घाटन

शाळेचा दैदीप्यमान इतिहास सांगणारी चित्रफीत सादर

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले होते. येथे काम करीत असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण मिळावे. या उद्देशाने २० जुलै १९५८ साली पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स वसाहतीमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेचे या वर्षी हीरक महोत्सवी आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रविवारी शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक सौरभ फुगे यांच्या हस्ते ‘ हीरक महोत्सवी कलादालनाचे’ आणि आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शाळा समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे आणि मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्या संकल्पनेतून हे कला दालन उभारण्यात आले आहे. यावेळी उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष शशांक परमाणे, उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात, संयोजक दत्तात्रय भोसले, शिक्षक रमेश गाढवे, आशा माने, जगदीश पवार, श्वेता नाईक आदी उपस्थित होते.

हे कलादालन उभारण्यात दत्तात्रय भोसले यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले असून मंगल साठे, सुषमा निरगुडकर, प्रताप पवार, केशव गेंगजे यांनी परिश्रम घेतले आहेत. यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी शाळेला भेट दिली होती त्या वेळचे फोटो, तसेच अनेक मान्यवरांनी शाळेच्या विविध उपक्रमात भेट दिली त्या वेळच्या फोटोंसह, या शैक्षणिक वर्षापर्यंतच्या शाळेच्या विविध उपक्रमांचे फोटो विद्यार्थी व पालकांना पाहण्यास मिळणार आहेत. या ठिकाणी जगदीश पवार यांनी तयार केलेली शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगणारी चित्रफीत देखील दाखविण्यात येणार आहे. सर्व पालकांनी व शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या दैदिप्यमान इतिहास दर्शवणाऱ्या कलादालनास भेट द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी केले आहे. तसेच हीरक महोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या आवारात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सादर केलेल्या विविध पंधरा खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. आयोजन शिक्षिका मनीषा कदम, रमेश गाढवे आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments