Sunday, February 15, 2026
Homeताजी बातमीज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी — डॉ. डी. वाय. पाटील युनटेक सोसायटीची नवी...

ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी — डॉ. डी. वाय. पाटील युनटेक सोसायटीची नवी जागतिक ओळख

पुणे | ३० ऑक्टोबर :

डॉ. डी. वाय. पाटील युनटेक सोसायटीने आपल्या शिक्षण क्षेत्रातील समृद्ध परंपरेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ आता नव्या रूपात ‘ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी’ या नावाने ओळखले जाणार आहे.

ही नवी ओळख उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि भविष्योन्मुख शैक्षणिक पद्धतीकडे वाटचाल करण्याचा निर्णायक टप्पा ठरणार आहे. या परिवर्तनामागे आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील सरांचे प्रेरणादायी नेतृत्व, डॉ. पी. डी. पाटील साहेब व डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांचे परिश्रम तसेच डॉ. सोमनाथ पाटील आणि डॉ. रोहिणी पाटील यांचा दूरदर्शी दृष्टिकोन आहे.

विद्यापीठाच्या नव्या नामांतराच्या घोषणेनिमित्त बोलताना डॉ. सोमनाथ पाटील म्हणाले,

“ही बदलाची प्रक्रिया केवळ नामांतरापुरती नाही, तर आमच्या ध्येय आणि दिशेचे पुनःस्मरण आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ज्ञान आणि उदात्त मूल्ये कायम राखत विद्यार्थ्यांना अधिक व्यापक आणि जागतिक दृष्टिकोन देईल. आजचे शिक्षण स्थानिक विचारांना जागतिक संधींशी जोडणारे असले पाहिजे.”

तसेच डॉ. रोहिणी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणाल्या,

“या विद्यापीठाचा पाया डॉ. डी. वाय. पाटील युनटेक सोसायटीच्या चार दशकांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर आधारित आहे. ‘ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी’ म्हणून आम्ही आता नव्या दृष्टिकोनासह पुढे जात आहोत. जागतिक क्षितिजाचा विस्तार, शिक्षणातील नवकल्पना आणि उत्कृष्ट नेतृत्व ही आमची आगामी दिशा असेल.”

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर या नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणात लवचिकता, बहुविषयक शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर देण्यात आला असून, त्याच दिशेने हे विद्यापीठ पुढे जाणार आहे.

विद्यापीठाची तीन प्रमुख उद्दिष्टे

  1. संशोधनाद्वारे जागतिक स्तरावर ठसा उमटवणे.
  2. उद्योगांशी संलग्न अभ्यासक्रमांद्वारे नाविन्यपूर्ण आणि भविष्योन्मुख शिक्षण देणे.
  3. भारताला जागतिक शिक्षणकेंद्र म्हणून बळकट करणे.

‘ज्ञान’ म्हणजे विद्या आणि ‘प्रसाद’ म्हणजे त्या विद्येचे वाटप — या मूलभूत तत्त्वांवर आधारित शिक्षण देणे हे ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचे ध्येय आहे. विद्यापीठाची ही नवी ओळख सातत्य, प्रगती आणि जागतिक उत्कृष्टतेचे प्रतीक ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments