Monday, December 4, 2023
Homeताजी बातमी१३ जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार… जेजुरी विकास आराखडाचे भूमीपूजन

१३ जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार… जेजुरी विकास आराखडाचे भूमीपूजन

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या काळात मंजुरी मिळाली होती.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तिर्थक्षेत्र जेजुरीच्या ३५६.६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला यावेळी जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून खंडोबा मंदिर तसेच कडेपठार मंदिर परिसर, मंदिरांची डागडुजी, दुरुस्ती, येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा, प्रसाधन गृहे, दिव्यांग भाविकांसाठी रस्ता, पिण्याचे पाणी, दुकानांची सुनियोजित व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन, योग्य वायुविजन, शहरांतर्गत रस्ते, वाहनतळ, बाह्यवळन रस्ता, कर्हा स्नान घाट, पालखी मार्ग विकसित करणे, आपत्कालीन मार्ग सुधारणा, आदी कामे होणार आहेत.

आराखड्यानुसार तीन टप्प्यात ही सर्व कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही मंदिर परिसर व दुरुस्त्यांची कामे होणार आहेत. भाविकांसाठी सोयी सुविधा यासाठी सुमारे १०९ कोटींचा निधी आवश्यक आहे. तीर्थक्षेत्र जेजुरीचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार

तसेच ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण – सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments