२२ सप्टेंबर २०२०,
आज पद्मश्री.डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती.कर्मवीर भाऊराव पाटील हे समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.ते ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्वाचे सदस्य होते.त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढयात हि सहभाग होता.
भाऊरावांनी कमवा व शिका हि संकल्पना राबऊन गरीब विद्यार्थाना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून दिले. केले.भाऊराव पाटील यांना अस्पृश्यतेबद्दल प्रचंड चीड होती. भाऊराव पाटील यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव होता. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर हि पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. पुणे विद्यापीठाने त्यांना इसवी सन १९५१ मध्ये डी. लिट. हि पदवी दिली. रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने संस्थेच्या पिंपरी कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला संस्थापक/अध्यक्ष धम्मराज साळवे व कार्याध्यक्ष अंजना गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी संस्थापक धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि, भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे व त्यांच्या कमवा व शिका या संकल्पनेमुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते ज्यांची परिस्थिती हलाखीची होती.अशी मुले आज मोठ्या मोठ्या पदावरती काम करत आहेत. भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे व आशिया खंडात आज सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था नामांकित आहे. व रयत विद्यार्थी विचार मंच संस्था देखील कर्मवीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करेन. व गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक न्याय हक्कासाठी काम करेल.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर कार्याध्यक्ष अंजना गायकवाड महासचिव संतोष शिंदे सचिव नीरज भालेराव उपस्थित होते.
दोन्ही संघांचा विचार केला तर राजस्थापेक्षा चेन्नईचा संघ वरचढ दिसत आहे. कारण चेन्नईच्या संघात सर्व नावाजलेले खेळाडू आहे. चेन्नईची सलामीची जबाबदारी शेन वॉटसन आणि मुरली विजय यांच्यावर असेल. त्यानंतर मधल्या फळीत अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, सॅम कुरन यांचा समावेश असेल. त्याचबरोबर फिरकीपटू म्हणून पीयुष चावला संघात असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा यावेळी दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर सोपवण्यात येईल.
राजस्थानच्या संघाचे कर्णधारपद स्टीव्हन स्मिथकडे आहे. त्यामुळे तो संघाला कसा आकार देतो आणि कशी रणनिती आखतो, याकडे सर्वांच लक्ष असेल. राजस्थानला रॉबिन उथप्पा आणि यशस्वी जैस्वाल हे दमदार सलामी करून देण्यासाठी सज्ज असतील. त्यानंतर मधल्या फळीत कर्णधार स्मिथ, डेव्हिड मिलर, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, रियान पराग हे फलंदाज असतील. राजस्थानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मुख्यत्वेकरून जोफ्रा आर्चर आणि वरुण आरोन यांच्यावर असेल. त्याचबरोबर टॉम करन आणि जयदेव उनाडकट हे दोघे त्यांना साथ देतील.