Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीकर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने अभिवादन

२१ सप्टेंबर २०२१,
आज पद्मश्री.डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती.कर्मवीर भाऊराव पाटील हे समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.ते ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्वाचे सदस्य होते.त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढयात हि सहभाग होता. भाऊरावांनी कमवा व शिका हि संकल्पना राबऊन गरीब विद्यार्थाना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून दिले. केले. भाऊराव पाटील यांना अस्पृश्यतेबद्दल प्रचंड चीड होती. भाऊराव पाटील यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव होता. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर हि पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. पुणे विद्यापीठाने त्यांना इसवी सन १९५१ मध्ये डी. लिट. हि पदवी दिली.

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने संस्थेच्या पिंपरी कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला संस्थापक/अध्यक्ष धम्मराज साळवे व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी संस्थापक धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि, भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे व त्यांच्या कमवा व शिका या संकल्पनेमुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते ज्यांची परिस्थिती हलाखीची होती.अशी मुले आज मोठ्या मोठ्या पदावरती काम करत आहेत.भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे व आशिया खंडात आज सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था नामांकित आहे. व रयत विद्यार्थी विचार मंच संस्था देखील कर्मवीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करेन. व गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक न्याय हक्कासाठी काम करेल.यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर ,महासचिव संतोष शिंदे,भोसरी विभाग प्रमुख मयूर जगताप,पिंपळे गुरव विभाग प्रमुख अभिजित लगाडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments