भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांचे देशासाठी दिलेले योगदान देशभक्तीची सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळयास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, मनोज तोरडमल, नितीन घोलप, शिवाजी साळवे, अरुण जोगदंड, आसाराम कसबे, गणेश साठे, अण्णा कसबे, विठ्ठल कळसे, वाघमारे, विशाल कसबे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, क्रांतीवीर लहुजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणा-या तरुणांना युध्द कलेचे प्रशिक्षण दिले होते. ते स्वत: युध्दकलेमध्ये निपूण होते. त्यांनी ‘ मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी ’ अशी क्रांतीकारी प्रतिज्ञा केली होती. तसेच तालीम, युध्द, कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभे केले होते. त्यांच्या देशभक्तीने प्रेरीत होऊन अनेक युवक इंग्रजांविरुध्दच्या बंडात सहभागी झाले होते तर वासुदेव बळवंत फडके यांनीदेखील इंग्रजांविरुध्द लढा देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा या थोर महापुरुषांच्या त्यागमय लढ्याचा वारसा भावी पिढीने जोपासावा असे आवाहन महापौर माई ढोरे केले.