Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृती दिनानिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 9 वा स्मृतीदिन विधान भवन येथे पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक असे उत्तुंग व्यक्तीमत्त्व ज्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान होते. शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या अशा महान नेतृत्वास स्मृतीदिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिवादन केले.

“महाराष्ट्राचं जगद्विख्यात नेतृत्व, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या आभाळाएवढ्या उंचीच्या महान नेतृत्वास स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. अद्वितीय वक्ता, साक्षेपी संपादक, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, मोठ्या मनाचा दिलदार माणूस, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय बाळासाहेबांना वंदन केले आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार सर्वश्री नाना पटोले, अशोक पवार, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, सरोज अहिरे, विक्रम काळे, कपिल पाटील, श्रीमती यामिनी जाधव, श्रीमती मनिषा कायंदे, निर्मला गावित, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, सुनिल झोरे, पुनम ढगे, सायली कांबळे यांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments