Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला शनिवारी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

त्यापूर्वी पहाटे अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी आठ वाजता विशेष गणेशयाग झाला. रात्री नऊ वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments