Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीमहाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर…

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर…

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 2 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील कर्नल दुश्यंत हणमंत सोनवणे यांना सेवेसाठी सेना पदक बहाल करण्यात आले असून याकरिता 1 लाख 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील शिपाई दीपक तुकाराम सकपाळ यांना शौर्यासाठी सेनापदक बहाल करण्यात आले असून याकरिता 12 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकिय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासननिर्णय साप्रवि चे दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments