Saturday, December 7, 2024
Homeअर्थविश्वगुगलने प्ले स्टोरवरून हटवले १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स

गुगलने प्ले स्टोरवरून हटवले १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स

१५ जानेवारी २०२१,
इंडिया ने माहिती दिली आहे की, त्यांनी भारतात प्ले स्टोरवरून असे अनेक अॅप्स हटवले आहे. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. हे अॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाइन लोन सर्विस देत होते. गुगलने आपल्या एका ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. सरकार आणि युजर्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर गुगलने ही कारवाई केली आहे. गुगलने जवळपास १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्सवर धडक कारवाई केली आहे.

गुगलचा हा निर्णय म्हणजे अशा वेळी आला आहे. ज्यावेळी गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्स शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. अनेक कंपन्या आपल्या लोनसाठी युजर्संचा छळ करीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काहींनी तर लोन फेडू न शकल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अॅक्सेस करीत होती. काहींनी तर वसूली एजन्टकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गुगलने त्या सर्व अॅप्स नंबरला शेयर केले नाही. ज्यांना नुकतेच प्ले स्टोरवरून हटवले आहे. दरम्यान, फिनटेक एक्सपर्ट श्रीकांत एल यांनी सांगितले की, गुगलने गेल्या १० दिवसांत कमीत कमी ११८ डिजिटल लोन अॅप्सला हटवले आहे. गुगलने पर्सनल लोन देणाऱ्या असंख्या कंपन्यांना विचारणा केली आहे की, ते कशा पद्धतीने लोकल कायदा आणि रेग्युलेशनला फॉलो करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments