१४ डिसेंबर २०२०,
भारतात जीमेल आणि युट्युब सेवा डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटरच्या माहितीनुसार गुगल, यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यूट्यूब आणि जी मेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत आहे. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद आहेत. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प आहेत. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत असून, या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.